Tue, Apr 23, 2019 21:59होमपेज › Satara › कराड दक्षिणमध्येच मी राहणार आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही

कराड दक्षिणमध्येच मी राहणार आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ग्वाही

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:48AMउंडाळे : प्रतिनिधी

मी दिल्लीला चाललोय असा अपप्रचार काहीजण करत आहेत. पण मी कुठेही जाणार नाही. मी इथेच कराड दक्षिण मतदारसंघात राहणार आहे. माझी कुणी बिलकुल चिंता करु नये. कोणी कितीही जोर लावला तरी आगामी निवडणुकीत काँग्रेसचेच सरकार येणार हे मी तर्कशुध्द पध्दतीने सांगत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. हवेलवाडी (सवादे) येथील नूतन सरपंच विकास थोरात व सदस्यांचा सत्कार समारंभ तसेच कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सुनील पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, राजेंद्र उर्फ आप्पा माने, पैलवान नानासाहेब पाटील, शिवाजीराव थोरात, वसंतराव चव्हाण, मंगल गलांडे, उत्तमराव पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, तानाजी चवरे, सर्जेराव शिंदे, दिलीप पाटील, उदय पाटील, कृष्णत थोरात, अ‍ॅड. ए. वाय. पाटील, प्रतापराव देशमुख, सुभाषराव पाटील, नितीन थोरात, आण्णासाहेब जाधव, अर्जुन शेवाळे, आबासाहेब शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. चव्हाण म्हणाले, माझ्या राजकीय भवितव्याबाबत अनेकांनी अपप्रचार सुरु केला आहे. पण मी कराड दक्षिण व राज्याचेच राजकारण करणार आहे. येत्या निवडणुकीत मोदी विरोधकांनी आपसातील मत विभाजन टाळले तर देशात व राज्यात सत्ता बदलेल. हे नाही झाले तर मोदी हुकूमशाही आणतील. त्यांनी मुंबईचे महत्व कमी करण्याचा  प्रयत्न केला. हट्टाहासाने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा खर्च लादला. व्यापारी त्यांच्यावर नाराज आहेत. राज्य सरकारने फसवी कर्जमाफी दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातील विकासाबाबत आकस केला जात आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्रलंबीत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत .

देशातील भाजपचे आमदार बलात्काराच्या प्रकरणात सापडले आहेत. त्यांना त्यांचेच मंत्री पाठिशी घालत आहेत. या सर्व प्रकारावर मोदी निषेध नोंदवायला तयार नाहीत. देशातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. मुस्लिम व दलितांचा द्वेष केला जात आहे. महिला सुरक्षित नाहीत. देशाचे सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. 

अजितराव पाटील, प्रदीप थोरात, ए. वाय. पाटील यांची भाषणे झाली. प्रा. ए. जी. थोरात यांनी प्रास्ताविक केले. संजय नांगरे व दिगंबर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आत्माराम पाटील यांनी आभार मानले.

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर विकास पहा..
मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर कराड दक्षिणमध्ये 1800 कोटींचा विकास निधी दिला. अगामी निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर नुसते विकासाचे आकडे मोजा, असेही आ. चव्हाण यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले. ते म्हणाले, कराड दक्षिणमधील विशेषतः उंडाळे व येळगाव खोर्‍यात मोठे दडपण होते. ती दहशत मोडल्याचे वातावरण बघून मला खूप समाधान वाटत आहे.