Tue, Nov 20, 2018 19:54होमपेज › Satara › 'सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही'

'सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

सरकारला सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही, असेही मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  

कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 

यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आज पुन्हा आठवण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रावर संकट ओढवले आहे. आज राज्यातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्राचा दर्जा घसरू लागला आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासने पाळली गेलेली नाहीत. नोटबंदी, जीएसटीमुळे व्यापारी, सर्वसामान्य लोकांना फटका बसला आहे. सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे. या परिस्थितीतून सरकार बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरही फसवणूक झाली असून असा भोंगळ कारभार आपण यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. आज बँकांसह अधिकाऱ्यांवरही चुकीची माहिती दिल्याबाबत आरोप केले जात आहेत. त्यामुळे युवक, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी एकत्र येत सरकारला प्रतिकार करावा, असे आवाहनही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.