Mon, May 27, 2019 01:02होमपेज › Satara › सातारा : लोणंदच्या प्राजित परदेशीने केले एव्हरेस्ट सर

सातारा : लोणंदच्या प्राजित परदेशीने केले एव्हरेस्ट सर

Published On: May 17 2018 10:58AM | Last Updated: May 17 2018 10:58AMलोणंद : प्रतिनिधी

लोणंद नगरीचे सुपुत्र, भाजपाचे कार्यकर्ते, भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, गिर्यारोहक प्राजित परदेशी यांनी जगातील सर्वात उंच व अवघड असणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गुरुवारी सकाळी सर केले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल लोणंद नगरीमध्ये  फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर प्राजीतने लोणंदच्याच नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्यात येत आहेत.

प्राजीत परदेशी यांची माऊंट एव्हरेस्ट ही खडतर मोहिम ७१ दिवसाची होती. दि. २० मार्च २०१८ रोजी त्यांनी  या मोहिमेस प्रारंभ केला, तर १७ मे रोजी भारताचा तिरंगा या शिखरावर फडकविला.
यापुर्वीही प्राजित परदेशी यांनी आळंदी ते पंढरपूर पायीवारी ५८ तासात पूर्ण केली व अष्टविनायक ४७० कि. मी अंतर १०४ तासात पूर्ण केले असून याची नोंद लिमका बुक आँफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याचबरोबर या मोहिमेसाठी माऊंट बेसीक कोर्सेसही झाले आहेत.

या मोहीमेवर जाण्यापुर्वी प्राजीत परदेशी यांनी  माऊंट एव्हरेस्टवर गेल्यानंतर जो आपल्या भारताचा ध्वज फडकविणार होते. तो तिरंगा ध्वज भैरवनाथ डोंगरावर आणून फडकविला  होता.  इतिहास घडविणाऱ्या लोणंदच्या सुपुत्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर , लोणंद नगरीतील मान्यवरांनी अभिनंदन केले.