Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Satara › सातारा : टेम्पोच्या धडकेत विद्यार्थीनी जागीच ठार

सातारा : टेम्पोच्या धडकेत विद्यार्थीनी जागीच ठार

Published On: Mar 14 2018 3:09PM | Last Updated: Mar 14 2018 3:16PMलिंब : वार्ताहर 

सातारा येथे टेम्पोने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पॉलिटेक्निकची विद्यार्थींनी जागीच ठार झाली आहे. या अपघातात आणखी एका मुलीसह दोघेजण जखमी झाले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून लिंबच्या दिशेने येणाऱ्या  टेम्पो (MH 08 H 6361 ) ने सातारकडे निघालेल्या स्कूटी ( MH 11CE 5713 ) ला तसेच दुसऱ्या दुचाकी ( MH11 BB 0658 ) या दोन्ही दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. यात स्कूटीवरील स्मिता दीपक अडसूळ रा. लालगून ता. खटाव या विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू झाला. तर तेजल पाटील रा. सदर बझार सातारा, प्रशांत जाधव रा.फलटण आणि किरण कदम  रा . सातारा हे तिघे जखमी झाले आहेत.