Thu, Nov 15, 2018 03:12होमपेज › Satara › सासरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

सासरच्या त्रासाने महिला पोलिसाची आत्महत्या

Published On: Jun 24 2018 9:11AM | Last Updated: Jun 24 2018 9:16AMसातारा : प्रतिनिधी

सासरच्या त्रासाला कंटाळून मुंबईत कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने कोंडवे येथे शनिवारी रात्री 11वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, स्वाती लखन निंबाळकर यांचे 2 वर्षांपूर्वी लखन यांच्यासोबत लग्न झाले होते. त्या मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सध्या त्या आपल्या सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना सासरकडील मंडळींकडून त्रास होत होता. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी शनिवारी रात्री 11 वाजता विष प्राशन केले. त्यांचे पहाटे 3 वाजता निधन झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कोंडवेत खळबळ उडाली आहे. स्वातीच्या आत्महत्येला तिच्या सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.