Wed, Nov 14, 2018 12:27होमपेज › Satara › शहरातील तीन जुगार अड्डयांवर छापा, लाखोंचा ऐवज जप्त

शहरातील तीन जुगार अड्डयांवर छापा, लाखोंचा ऐवज जप्त

Published On: Mar 22 2018 6:12PM | Last Updated: Mar 22 2018 6:12PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरालगत प्रतापसिंहनगर, संगमनगर येथील परिसरात सातारा एलसीबी व शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी 3 जुगार अड्ड्यांवर धाड टाकून सुमारे दहा जनांना अटक केली. पोलिसांनी या कारवाईत दुचाकीसह रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोक्का लागलेला दत्ता जाधव याचा भाऊ युवराज जाधव याचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags :  satara, police, Gambling, read