Wed, Jul 17, 2019 00:36होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यास पोलिस कोठडी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यास पोलिस कोठडी

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:27PMकराड : प्रतिनीधी

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवार दि. 2 रोजी न्यायालयासमोर हजर केले असता शनिवार दि. 5 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विकास ऊर्फ सखाराम शिवाजी मोहिते (वय 20) असे संशयिताचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, संशयिताने एका अल्पवयीन 

मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर संशयिताने अल्पवयीन मुलीस अकलुज तालुक्यातील भांडगांव येथे नेले होते. दरम्यान संशयिताच्या वडिलांनी त्यास वेळोवेळी फोन करून समजावून सांगत कराडला बोलवून घेतले. त्या दोघांना पोलिस ठाण्यात आणल्यावर संशयितावर बालकांचा लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.