Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Satara › पोलिसाकडूनच कायदा धाब्यावर, वडिलांसह मुलास मारहाण 

पोलिसाकडूनच कायदा धाब्यावर, वडिलांसह मुलास मारहाण 

Published On: Mar 05 2018 8:15PM | Last Updated: Mar 05 2018 8:15PMफलटण : प्रतिनिधी 

तिरकवाडी (ता.फलटण) येथे गहू काढला नाही म्हणून दारू पिऊन पोलिसाने वडील, मुलगा आणि ड्रायवरला मारहाण केल्‍याची घटना समोर आली आहे. मारहाण करणारा संशयित पोलिसमध्ये असल्याने दादागिरी करत इतर दहा ते बारा जणांना पाठवून मारहाण केली. रत्नसिंह सोनवलकर असे संशयित पोलिसाचे नाव आहे. या प्रकारानंतर पीडित तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्यावर चिडून पुन्हा एकेरी भाषेत त्‍यांना अरेरावीची भाषा वापरली. त्या पोलिसाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, संशयित पोलिसाने गहू काढण्याच्या मशीनने माझा गहू लगेच काढावा अशी दारू पिऊन दादागिरी केली व माझा गहू लगेच काढायचा अशी दमदाटी केली. या वेळी पीडितांनी अगोदर दुसऱ्या ठिकाणचा गहू काढून येतो असे सांगितले. परंतु, त्यांचे न ऐकता मशीन चालक सुखवेनदर सिंग (वय 35), पांडुरंग विठ्ठल मदने (वय 60) आणि त्यांचा मुलगा प्रमोद पांडुरंग मदने यांना मारहाण केली.