Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Satara › सातारा : तारळेतील आगीत दुकान भस्मसात; १० लाखांचे नुकसान (video)

सातारा : तारळेतील आगीत दुकान भस्मसात; १० लाखांचे नुकसान (video)

Published On: Jan 25 2018 3:43PM | Last Updated: Jan 25 2018 3:44PMतारळे : वार्ताहर

तारळे (ता. पाटण) परिसरात तारळे - घोट रस्त्यावरील केदरनाथ फोटो स्टुडिओ आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्र एकत्र असलेल्या दुकानास गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.

या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. विजय सपकाळ यांच्या मालकीच्या या दुकानातील फोटो कॅमेरे, बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचे साहित्य, फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे.