Tue, Nov 13, 2018 21:43होमपेज › Satara › फलटणमध्ये शॉर्ट सर्किटमुळे पाच घरांना आग

फलटणमध्ये शॉर्ट सर्किटमुळे पाच घरांना आग

Published On: Feb 02 2018 4:50PM | Last Updated: Feb 02 2018 4:50PMफलटण :  प्रतिनिधी 

टाकळवाडा ता.फलटण येथे शॉर्टसर्किट होऊन चार ते पाच घरांना आग लागली. या आगीत घरातील दोन गॅसचा स्फोट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, टाकळवाडा ता.फलटण येथील घरावरून महावितरणची घरगुती वापराची विद्युत वाहिनी गेली आहे. त्या वाहिनीला आज शुक्रवार दि. 2 रोजी दुपारी 1 च्या दरम्यान दोन तारांचा एकमेकांना स्‍पर्श झाल्‍याने स्पार्किंग झाले. त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. ही आग पसरत गेली. या आगीत आसपासच्या चार ते पाच घरातील सामानाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी फलटण पालिकेचा अग्निशमक दल पोहोचला असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.