Mon, May 20, 2019 22:07होमपेज › Satara › मक्या शिरतोडेवर मोक्कांतर्गत कारवाई 

मक्या शिरतोडेवर मोक्कांतर्गत कारवाई 

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 19 2018 11:42PM
फलटण : प्रतिनिधी 
कुख्यात गुंड व तब्बल 24  चोर्‍यांच्या गुन्ह्यात गेली सहा ते सात वर्षे गुंगारा देणारा फलटणमधील सराईत गुंड व पती-पत्नींना गाठून बळजबरीने चोर्‍या करणारा महेश ऊर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (वय 29, रा. मोती चौक, फलटण) याला मोक्का लावणार असल्याची माहिती  फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे  परीविक्षाधीन अधिकारी पवन बानसोड     यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
फलटण येथील आपला प्रोबेशनरी पिरेड समाप्ती प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिताफीने माक्याला मोटारसायकलवरून पळून जात असताना पकडले. त्याच्यावर सातारा व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातून 24 गुन्हे दाखल होते तर अजून अनेक ठिकाणच्या गुन्ह्यात तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सामील असल्याचे उघड होत आहे, असे बनसोड म्हणाले.
गेली सहा ते सात वर्षे चोरी प्रकरणात सामील असणार्‍या माक्यावर फलटण शहर, ग्रामीण, सातारा शहर, ग्रामीण, पुणे  शहर, ग्रामीण, वाठार स्टेशन, पुसेगाव, खंडाळा, दहिवडी,  कोरेगावसह  अजून इतर ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असून त्याला फलटण- सातारा रोडवर तावडी फाटा ता.फलटण  येथे  पकडण्यात पोलिसांना यश आले . त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख व आयजी विश्‍वास नांगरे पाटील यांना  तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. यामुळे जबरी चोर्‍यांना काही प्रमाणात आळा बसेल, असे पवन बनसोड यांनी सांगितले.