Wed, Apr 24, 2019 19:43होमपेज › Satara › ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:43PM

बुकमार्क करा
फलटण : प्रतिनिधी

फलटण येथील पृथ्वी चौकातच शुक्रवारी सकाळी 9.20 च्या सुमारास भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने चाकाखाली सापडून दुचाकीस्वार वृद्ध जागीच ठार झाला. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला, नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. साहेबराव अण्णा राऊत (वय 60, रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. 

ट्रक (एमएच - 45 - 0078) हा पृथ्वी चौकातून नाना पाटील चौकाकडे भरधाव वेगात निघाला होता. यावेळी साहेबराव राऊत हेही दुचाकीवरून (एमएएच 11- सी 8853) निघाले होते. त्यांना पाठीमागून या ट्रकने धडक दिली. त्यामुळे राऊत दुचाकीवरून पडून ट्रकच्या चाकाखाली आले. यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन केला. याप्रकरणी ट्रकचालक तात्या उत्तम माने (रा. सापटने, टेंभुर्णीजवळ, ता. माढा, जि. सोलापूर) हा पसार झाला होता. तथापि, पोलिसांनी त्याला फलटणमध्येच अटक केली. याप्रकरणी स्वप्निल विष्णू गायकवाड यांनी फिर्याद दिली असून, चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक मुंढे करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी धुळदेव येथे साहेबराव राऊत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.