Fri, Jul 19, 2019 01:11होमपेज › Satara › फलटण : दुसऱ्या पतीचा खून, पहिल्या पतीला अटक

फलटण : दुसऱ्या पतीचा खून, पहिल्या पतीला अटक

Published On: Mar 04 2018 6:35PM | Last Updated: Mar 04 2018 6:35PMफलटण :  प्रतिनिधी  

मालेगाव (जि. नाशिक) येथील परप्रांतीय डाळिंब व्यापारी पतीचा खून करून फरार झालेल्या पत्नीसह तिच्या पहिल्या पतीस रमजानपुरा (मालेगाव) पोलिसांनी अटक केली. त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरून शुक्रवार दि.2 मार्च रोजी रात्री 8 च्या दरम्यान पोलिसांनी त्‍यांना ताब्यात घेतले. या दोघांना मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

त्यांची इतर तपासणी केली असता, त्यांचा फलटण शहरात कोणाशीही संबंध आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी फलटण मार्गे अजून पुढे कुठे जाणार होते का? किंवा अजून कोण या घटनेत सामील आहे का? याचा तपास पोलीस घेत आहेत.

तसेच त्यांच्याजवळ असलेल्या सामानाची तसेच कोणाला त्यांनी फोन केले अथवा अजून त्यांना पुढे कुठे जायचे होते याचा तपास पोलीस घेत आहेत. या दोघा पती पत्‍नीला मालेगाव पोलिसांनी अधिक तपासणी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.