Tue, Nov 13, 2018 22:13



होमपेज › Satara › फलटणमध्ये स्कूल व्हॅन पेटली, विद्यार्थी सुखरूप

फलटणमध्ये स्कूल व्हॅन पेटली, विद्यार्थी सुखरूप

Published On: Jan 01 2018 6:32PM | Last Updated: Jan 01 2018 6:32PM

बुकमार्क करा




फलटण : प्रतिनिधी 

फलटण येथील खाजगी शाळेच्या स्कूल वाहनांने अचानक पेठ घेतला. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने मुलांना बाहेर काढण्यात यश आले. या मुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा वाजता घडली.

या बाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार तिरकवाडी हायस्कुल च्या मुलांना ने आण करणाऱ्या स्कूल व्हॅन ने कोळकी जवळ अचानक पेठ घेतला. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीतून मुलांना बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

तिरकवाडी ता.फलटण येथे जात असताना कोळकी ता.फलटण येथे हायस्कूल ची विद्यार्थी वाहक व्हॅन पेटली. यामध्ये आठ विद्यार्थी होते. अंदाजे शॉर्टसर्किट मुळे या गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.