Thu, Jan 17, 2019 16:24होमपेज › Satara ›  फलटण खूनप्रकरणी एका संशयिताला अटक 

 फलटण खूनप्रकरणी एका संशयिताला अटक 

Published On: Dec 05 2017 9:47AM | Last Updated: Dec 05 2017 9:47AM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी 

नाईकबोंबवाडी (ता.फलटण) येथील तातमगिरी रस्त्यावर दगडाने ठेचून झालेल्या खुनातील व्यक्‍तीची ओळख पटली आहे. मृत व्यक्तीचे नाव सचिन विश्वनाथ ठाकूर (वय, १९, रा.काळेवाडी पुणे) असे आहे. या खूण प्रकरणी पुणे येथील एका संशयित आरोपीला वाकड पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले आहे.  

सचिन याचा खून का व कशासाठी केला याबाबत वाकड (पुणे) व फलटण (ग्रामीण) चे पोलिस अधिक तपास करीत आहेत. जुन्या भांडणातून हा खून झाला असेल असे मत पोलिसांकडून व्यक्त होत असून, सचिन याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे नातेवाईक फलटण येथे पोहोचले आहेत.