Sun, Aug 18, 2019 15:37होमपेज › Satara › माझ्या जीवितास धोका; ना. रामराजेंचा दिलखुलास पंच

माझ्या जीवितास धोका; ना. रामराजेंचा दिलखुलास पंच

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:28PMफलटण : प्रतिनिधी 

‘मी आता खाली राहणार नाही, मला आता वर जायचे आहे’, अशी टोलेबाजी करत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्‍लीला जाण्याचे संकेत दिले. मात्र, म्हाडा की सातारा याबाबत ते काहीच बोलले नाहीत. सध्या आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत रामराजेंनी गमतीदार पंच मारला. 

 खा. उदयनराजे व ना. रामराजे हे राष्ट्रवादीचे दोन्ही हेवीवेट नेते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यातून विस्तवही जात नाही. काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजे यांनी फलटणमध्ये येऊनच ना. रामराजे यांच्यावर निशाणा साधत तुमच्या घरी यायला वेळ लागणार नाही, असा सज्जड दम भरला होता. यानंतर ना. रामराजे यांनीही सातारा येथे 
जाऊन मी कोणत्याही गोष्टी विसरलो नाही. वेळ आल्यावर शिकार करणारच असे ठणकावून सांगितले होते.

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्याने दोघांमध्ये प्रतिवार सुरू आहे. खा. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीचा नेता अथवा कार्यकर्ता खासदारकी लढवा असे म्हणत नाही. मात्र, इतर सर्वच पक्षातील नेते खा. उदयनराजेंना तिकीट देण्यास तयार आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीने ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. पक्षाने जरी याकडे कानाडोळा केला असला तरी ना. रामराजे हे खा. उदयनराजेंवर तोफ डागत आहेत. 

फलटण येथे एका खासगी कार्यक्रमासाठी रविवारी ना. रामराजे उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी खा. उदयनराजे यांना आपल्या निशाण्यावर ठेवले मात्र त्यांचे नाव न घेता हसत हसत पंच मारला. आपल्या जिवीतास धोका असल्याचे सांगून रामराजे दिलखुलास हसले.