Thu, Apr 18, 2019 16:30होमपेज › Satara › सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवा : आ. पतंगराव कदम 

सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवा : आ. पतंगराव कदम 

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 11:52PM

बुकमार्क करा

मसूर : वार्ताहर

संघटना, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी केले.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या मसूर जनसंपर्क कार्यालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख गोल्डन पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.  गोल्डन पवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. मोहनराव कदम, आ. आनंदराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजीत कदम तसेच युवा नेते नितेश कदम, अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे काम आपण प्रामाणीकपणे करीत आहोत. काँग्रेसच्या ध्येय धोरणामुळे आपण प्रभावीत झालो असून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या वाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या सहकार्‍यांसह प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. निरंजन साळुंखे, प्रविण पवार, प्रदिप शिंदे, संजय जाधव, राजेंद्र जगदाळे, सुयोग कांबिरे यांच्यासह मसूर क्रिडा मंडळ व आई तुळजाभवानी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.