Thu, Jan 17, 2019 00:47होमपेज › Satara › यशवंतराव चव्हाण म्हणत असतील, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

यशवंतराव चव्हाण म्हणत असतील, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, औद्योगिक धोरणाचा पाया घातला. यातून सहकार क्षेत्र समृध्द झाले. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास साधला गेला. मात्र, आजची विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर चव्हाणसाहेबांना वाटत असेल ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ अशा शब्दात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी भाजप सरकारवर निशाना साधला. 
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.

डॉ. कदम म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकारण केले नाही तर समाजकारणही केेले. समाजकारण करत असताना प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे हे त्यांचे धोरण होते. प्रत्येक क्षेत्राची त्यांना आवड होती. साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची त्यांना विशेष आवड होती. असा नेता परत होणे नाही. त्यांनी समृध्द महाराष्ट्राचे स्वप्न पहिले होते. त्यामुळे 1962 मध्ये महाबळेश्‍वर येथील काँग्रेसच्या शिबिरामध्ये त्यांनी कृषी, औद्योगिक धोरणांची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे जाळे विणले गेले. साखर कारखाने, बँका उभ्या राहिल्या. आज महाराष्ट्राचा जो विकास साधला गेला आहे, त्यामध्ये सहकार  चळवळीचे मोठे योगदान आहे. आजची  विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ असा प्रश्‍न स्व. यशवंतराव चव्हाण यांना वर पडला असेल. या परिस्थितीतही महाराष्ट्रातील जनता मार्ग काढेल आणि चव्हाण साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करेल, असेही डॉ. कदम म्हणाले.