Sat, Feb 23, 2019 11:08होमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्तांची आंदोलनस्थळी रंगपंचमी

कोयना प्रकल्पग्रस्तांची आंदोलनस्थळी रंगपंचमी

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:25PMपाटण : प्रतिनिधी

कोयना प्रकल्पग्रस्तांचे  न्याय व हक्कासाठी कोयनानगर येथे मंगळवारी सलग नवव्या दिवशीही अंदोलन सुरूच होते. सोमवारी आंदोलनस्थळी श्री. छ.खा उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. तर मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी अंदोलन स्थळावर रंगपंचमी साजरी केली. 

 कोयना धरण निर्मितीसाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी दिल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना साठ वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, महसुली गावे, गावठाण, शासकीय नोकरी, नागरी सुविधांचे प्रश्‍न आदीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे नेते  डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर येथे दि 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरूच आहे. सोमवारी आठव्या दिवशी खा. उदयनराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. त्यांचे प्रश्‍न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे अश्‍वासन दिले. मंगळवारी अंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थळावर आपल्या परिवारासह  रंगपंचमी साजरी केली.