Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Satara › कोयना परिसरात भूकंपाचे धक्‍के

कोयना परिसरात भूकंपाचे धक्‍के

Published On: Jan 16 2018 6:23PM | Last Updated: Jan 16 2018 6:23PM

बुकमार्क करा
पाटण :  प्रतिनिधी

कोयना धरण परिसरासह पाटण,कराड व चिपळूण तालूक्‍यातील अनेक ठिकाणी आज ३.३ रिश्टर स्‍केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्‍का जाणवला. भूकंपाचे धक्‍के आज मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जाणवले.

या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २२. ४ किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यात जावळे गावच्या दक्षिणेला चार कि. मी. अंतरावर होता. त्याची खोली ९ कि. मी. अंतरावर होती. पाटण, कराड, चिपळूण, अलोरे, कोयना या विभागात या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भूकंप मापन केंद्र कोयनानगर यांनी दिली. या भूकंपामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्‍त हानी झालेली नाही.