Wed, Apr 24, 2019 21:34होमपेज › Satara › बसस्थानकात उग्र वासामुळे प्रवाशांच्या डोळ्यांची जळजळ

बसस्थानकात उग्र वासामुळे प्रवाशांच्या डोळ्यांची जळजळ

Published On: Jan 14 2018 10:22AM | Last Updated: Jan 14 2018 10:21AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा बसस्थानक परिसरात शनिवारी सायंकाळी प्रवाशांचे डोळे अचानक चुरचुरू लागल्याने खळबळ उडाली. प्रवाशांना काही प्रमाणात उग्र वासही सहन करावा लागला. मात्र 
हे सगळे कशामुळे होत आहे याचा उलगडा होत नसल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत हा सगळा प्रकार नेमका कशामुळे होत आहे हे समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा बसस्थानक परिसरात शनिवारी सायंकाळी सर्व प्रवाशांना उग्र वासाचा सामना करावा लागला.

प्रवाशांचे डोळे चुरुचुरू लागले. हा सगळा प्रकार कशामुळे होत आहे याची माहिती त्यांना मिळेनाशी झाली. बसस्थानक परिसरात  असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनाही त्रास जाणवू लागला. त्यांनीही याचे कारण शोधण्याचा  प्रयत्न केला. मात्र, माहिती समजू शकली नाही.  या प्रकाराची माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठांना आणि मुख्यालयाला तातडीने  कळवली. दरम्यानच्या काळात आयजी इन्स्पेक्शन तयारीसाठी अश्रूधुराच्या नळकांड्या पोलिस परेड ग्राऊंडवर फोडल्या असण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली.

कदाचित  त्याचाही परिणाम झाला असेल, असे बोलले जात आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात स्वच्छता करताना टाकलेल्या अ‍ॅसिडमुळेही त्रास होत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र नेमके कशामुळे हे घडले हे समजू शकले  नाही. रात्री वरिष्ठ पोलीस  अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सातारा बसस्थानक परिसरास भेट देवून पाहणी केली.