Wed, Sep 19, 2018 10:30



होमपेज › Satara › सातारा : पालखीहून परतणारी महिला अपघातात ठार

सातारा : पालखीहून परतणारी महिला अपघातात ठार

Published On: Jul 15 2018 10:38AM | Last Updated: Jul 15 2018 10:38AM



लोणंद : प्रतिनिधी

माऊलीची पालखी तरडगाव मुक्कामी असताना दर्शन घेऊन परत येताना रस्ता क्रॉस करताना रस्त्यामधील दुभाजकावर उभा असणाऱ्या कविता विशाल तोष्णीवाल ( वय ४२ रा. महाबळेश्वर) यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने ठार झाल्या.

महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल व त्यांचे कुंटुबिय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते. रात्री साडे बारा वाजता माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी तळाजवळ लोणंद-फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागील डिव्हायडरवर थांबलेल्या होत्या. यावेळी कविता यांना लोणंदकडून फलटण जाणाऱ्या पाणी टँकर (क्र. एमएच १०- झेड-२७०८) ने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनला टँकर चालक यशवंत पावले (वय 30 रा. पावलेवाडी ता. शिराळा जि. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे.कॉ. दतात्रय दिघे करत आहेत.