Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Satara › सातारा : हृदयविकाराच्या झटक्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने तीन वारकऱ्यांचा मृत्यू

Published On: Jul 15 2018 12:06PM | Last Updated: Jul 15 2018 12:06PMफलटण : प्रतिनिधी 

तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत फलटण शहर पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार कलुबा तुळशीराम सोलने (वय ६५ रा. सिंदखेड राजा जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय ५५ रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत असताना  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  झाला. या घटनेने शोककळा पसरली असून माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे अनेक भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फलटणचे प्रांत संतोष जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विजय पाटील, व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी या दिंडीतील लोकांची भेट घेऊन या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.