Tue, Sep 25, 2018 14:42होमपेज › Satara › पाचगणी : आंबेघर येथील अपघातात दोघे ठार

पाचगणी : आंबेघर येथील अपघातात दोघे ठार

Published On: Feb 24 2018 9:46PM | Last Updated: Feb 24 2018 9:46PMपाचगणी :  वार्ताहर 

आंबेघर ता. जावली येथे दुचाकी व कारमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला मेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

या अपघातात प्रशांत सावले, समीर पार्टे हे जागीच मृत झाले तर संजय सावले हा गंभीर जखमी झाला आहे. चारचाकी वाहन (एमएच ११ वाय ४८७५) तर दुचाकी (एमएच ११ सीडी ३८८९) यांची समोरा-समोर धडक झाली.