Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Satara › नारायण राणेंच्या पत्नी विरोधात अटक वॉरंट

नारायण राणेंच्या पत्नी विरोधात अटक वॉरंट

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 11:06PM पाचगणी : सादिक सय्यद

 पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या महाबळेश्वर तालुक्यातील तीस अनधिकृत बांधकामांना नवी दिल्लीच्या फरिदाबाद कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. यामध्ये क्षेत्रमहाबळेश्‍वर येथे मालमत्ता असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ. निलिमा राणे यांच्या नावाचाही उल्‍लेख आहे. संबंधितांना अटक करण्याचे आदेश महाबळेश्‍वर पोलिसांना प्राप्‍त झाले आहेत.

पाचगणी व महाबळेश्‍वर हा नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील भाग असून येथे बांधकाम करण्यासाठी काटेकोर नियमावली ठरवली आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून धनदांडग्यांकडून नियम धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. पर्यावरणप्रेमींकडून वारंवार आवाज उठवूनदेखील प्रशासन गांधारीच्या भूमिकेत होते. मात्र,  पर्यावरणप्रेमींनी हरीत लवादाकडे दाद मागितली होती. त्यानुसार हरीत लवादाने अनधिकृत बांधकामधारकांना समन्स बजावले होते. मात्र, आता हरित लवादाच्या सुप्रीम कोर्टाने     फतीस जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्याची माहिती  महाबळेश्‍वर पोलिसांनी दिली असून या बाबतचे आदेशही आपल्याला प्राप्‍त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यामध्ये आसावरी संजीव दातार (रा.दरे), आर्ची डॅनियल डिसोजा, खेमाजी नादजी पटेल, अतुल चितामणी साळवी, संदीप नंदकुमार साळवी, चंद्रशेखर चंद्रकांत साबणे, कुसुम प्रताप ओसवाल, मोलु लेखराज खोसला,  राजन भालचंद्र पाटील (सर्व रा.मेटतळे), शंकरलाल बच्चुभाई भातुथा (रा.दुघोशी घोगलावाडी), मनोहर रामचंद्र शिंदे,  संतोष हरीभाऊ जाधव, गिनात्री अशोक भोसले (सर्व रा.कुभरोशी), प्रल्हाद नारायणदास राठी, निलीमा नारायण राणे (दोघे रा.क्षेत्रमहाबळेश्‍वर), महेश बाबुलाल पांचाळ, चांद मोहम्मद वाईकर (रा.नाकींदा), शिरीष मधुसुदुन खैर, खुर्षीद इस्माईल अनसांरी, संदानंद महादेव करंदीकर, विठ्ठल बाबू दुधाणे ( सर्व रा. खिंगर), विठ्ठल दगडू गोळे, शांताराम परबती गोळे, केशव धोडींबा गोळे (सर्व रा.भोसे), सलीम उस्मान वाईकर (रा.नाकींदा), सुनिल मोहन रेड्डी (रा.मेडगुताड), पुजा गजानन पाटील (रा.अवकाली), सग्रामसिंह अप्पासाहेब नवले (रा.भेकवली), मनिषा संतोष शेंडगे (रा.शिदोला) या सवार्ंना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी हरीत लवादाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

दरम्यान, हरीत लवाद सुप्रीम कोर्टाने अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना अटक वॉरंट जारी करत दि.30 जुलै रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश महाबळेश्‍वर पोलिसांना दिले आहेत. अनधिकृत बांधकाम करणार्‍या धनदांडग्यांची अटक वॉरंट निघाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.