Fri, Nov 16, 2018 09:30होमपेज › Satara › शाहूपुरीत स्वाइन फ्लूने एकाचा बळी

शाहूपुरीत स्वाइन फ्लूने एकाचा बळी

Published On: Sep 12 2018 12:57PM | Last Updated: Sep 12 2018 12:57PMकण्हेर : वार्ताहर

सातारा शहरालगत असणाऱ्या शाहूपुरी मधील रेणुका कॉलनी येथील नितीन मधुकर जाधव ( वय, ४० ) यांचा बुधवारी पहाटे उपचार दरम्यान स्वाइन फ्लूने  मृत्यू झाला. यामुळे शाहूपुरी परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन जाधव हे आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान डॉक्टरांच्या अहवालमध्ये स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले. बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. शाहूपुरी हे सातारा शहरा लगतचे उपनगर आहे. त्या ठिकाणी स्वाईन फ्लूचे काही रुग्ण आढळले. 

पावसाळ्यात साथीच्या रोगांची लागण लवकर होते. त्यामुळे तेथील नागरिकांनी काळजी घेण्याचे गरजेचे बनले आहे. शिवाय जाधव यांच्या शेजारीच सांडपाण्याची गटार गंगा उघड्यावरच वाहत असल्याने तेथे  दुर्गंधी पसरली आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या बाबत वेळोवेळो ग्रामपंचायतीस तक्रार देऊन देखील दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव यांनी केला आहे.