Wed, May 27, 2020 03:19होमपेज › Satara › साताऱ्यात आणखी एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ३

साताऱ्यात आणखी एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या ३

Last Updated: Apr 02 2020 9:51PM

file photoसातारा : पुढारी वृत्तसेवा 

सातारा जिल्ह्यातील कराड येथील ३५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर इतर १८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

याआधी परदेशवारी करुन आलेल्यांपैकी २ जण कोरोनाने बाधित आढळून आले आहेत. आज आणखी एका रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३ झाली आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सातारा शहरातील २ आणि कराडमधील एकाचा समावेश आहे. साताऱ्यात कोरोनाचा धोका वाढला असून आणखी १८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. 

याआधी दोन रुग्ण आढळून आले आहेत. दुबईवरून आलेल्या ४५ वर्षीय एका महिलेला कोरोना झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालात स्पष्ट झाले होते. तर कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेल्या व्यक्तीला ताप व घसादुखी असल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या संशयित रुग्णाची चाचणी केली असता त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.