Mon, May 20, 2019 21:09होमपेज › Satara › फलटणमध्ये ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार 

फलटणमध्ये ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार 

Published On: Jan 12 2018 10:06AM | Last Updated: Jan 12 2018 10:06AM

बुकमार्क करा
फलटण : प्रतिनिधी 

पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, 63 रा.लक्ष्मीनगर फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (एमएच - 45 - 0078) पृथ्वी चौकातून नाना पाटील चौकाकडे जात होता. यावेळी  मोटारसायकलवरून जात असलेले साहेबराव राऊत हे ट्रकखाली सापडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून, ते अपघाताची अधिक माहिती घेत आहेत.