Tue, Sep 25, 2018 08:37होमपेज › Satara › सातारा : पोलिसांची यशस्वी कामगिरी; 8 तासात लावला चोरीचा छडा 

सातारा : पोलिसांची यशस्वी कामगिरी; 8 तासात लावला चोरीचा छडा 

Published On: Mar 08 2018 2:27PM | Last Updated: Mar 08 2018 2:27PMसातारा : प्रतिनिधी

सातारा बसस्थानकामध्ये संशयितरीत्या फिरत असलेल्या अजय पंडित (रा.मलवडी ता.माण )याला स्टँड चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने लॅपटॉपसह विविध वस्तूंची चोरी केली असल्याचा जबाब पोलिसांना दिला. स्टँड चौकीतील पोलिसांमुळे अवघ्या 8 तासात या चोरीचा छडा लागण्यास मदत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी स्टँडमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती. पोलिस चौकीतील पोलिस हवालदार प्रवीण पवार, केतन शिंदे, दत्ता पवार, अरुण दगडे, हे गस्त घालत होते. पंडित हा संशयास्पद आढळल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली. चौकशीवेळी त्याने लॅपटॉप चोरला असल्याचे सांगताच पोलिसांनी त्याच्याकडील एक मोबाईल व रोख 3 हजार रुपये जप्त केले. दरम्यान, पुढील चौकशीसाठी संशयिताला दहिवडी पोलिसांकडे वर्ग केले आहे.