Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Satara › मोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा पोलिसांच्या ताब्यात

Published On: Feb 13 2018 8:39PM | Last Updated: Feb 13 2018 8:38PMकराड : प्रतिनिधी

एसटीमध्ये पाठीमागे बसून महिलेचे मोबाईलमध्यक चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी कोल्हापूर ते कराड दरम्यान संबंधिताचा हा प्रकार सुरू होता. ही बाब एसटीतील काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी महिला वाहकाच्या मदतीने संबंधितास कराड पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर-भोर एसटी कोल्हापूरमधून कराडकडे येत होती. या एसटीमध्ये कराड, सातारा तसेच पुढे जाणारे प्रवाशी बसले होते. एसटीत एका दाम्पत्याच्या पाठीमागील सीटवर संबधीत आरोपी बसला होता. प्रवासात समोरील सीटवर बसलेल्या महिलेची झोप लागल्याचे लक्षात येताच त्याने आपल्याजवळील मोबाईलव्दारे महिलेचे चित्रीकरण सुरु केले. चित्रीकरण करत असताना त्याने मोबाईलवर रुमाल झाकला होता. ही गोष्‍ट इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्‍यांनी या व्यक्‍तिला पोलिसांच्या ताब्‍यात दिले.