Fri, Apr 26, 2019 19:36होमपेज › Satara › कराड : 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन (व्‍हिडिओ)

कराड : 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन (व्‍हिडिओ)

Published On: Jan 05 2018 4:26PM | Last Updated: Jan 05 2018 4:26PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

प्रचंड खपाचे एकमेव नि:पक्ष व निर्भीड दैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक पुढारीच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह सत्ताधारी यशवंत - जनशक्ती - लोकसेवा आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह नूतन पालिका सभापतींनी 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

शुक्रवारी कराड नगरपालिकेच्या नूतन सभापतींनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी दैनिक पुढारीच्या कराड कार्यालयास भेट दिली. यावेळी राजेंद्रसिंह यादव यांच्यासह उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, माजी सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती प्रियांका यादव, पाणी पुरवठा सभापती अरूणा पाटील, नियोजन सभापती कश्मिरा इंगवले, महिला व बालकल्याण सभापती आशा मुळे यांच्यासह माया भोसले, शारदा जाधव, अर्चना ढेकळे, राजेंद्र माने, किरण पाटील, महेश कांबळे, अतुल शिंदे, गजेंद्र कांबळे, सर्व नगरसेवक, यांच्यासह सुरेश पाटील, प्रितम यादव, शिवराज इंगवले, ओमकार मुळे, सुधीर एकांडे, नितीन ढेकळे यांच्यासह सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

'पुढारी'कार पद्मश्री स्व. डॉ. ग. गो. जाधव यांच्यासह प्रतापसिंह जाधव यांनी निर्भीडपणा कायम ठेवत सर्वसामान्य लोकांवरील अन्यायास वाचा फोडली आहे. पुढारीकडून केले जाणारे सामाजिक प्रबोधनाचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करत यादव यांनी दैनिक पुढारीस शुभेच्छा दिल्या.