Wed, Sep 19, 2018 08:39होमपेज › Satara › फलटणमध्ये सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल'(व्हिडिओ)

फलटणमध्ये सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल'(व्हिडिओ)

Published On: Dec 06 2017 11:52AM | Last Updated: Dec 06 2017 11:52AM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी  

सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी  सकाळी ९ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी  राष्ट्रवादीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देवून निषेध करण्यात आला. 

महाराष्ट्र राज्यात भाजप सरकारकडून फक्त आश्वासनाची खैरात  होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे . शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण, कुपोषण,  ढासळलेली शिक्षण व्यवस्था, संपकरी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आश्वासनांची न होणारी पुर्तता, आरोग्य व्यवस्था, वीज समस्या, महागाई आदी प्रश्नांमध्ये जनतेला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन पुकारले असल्‍याचे राष्‍ट्रवादीकडून यावेळी सांगण्यात आले.

या आंदोलनात आमदार दिपकराव चव्हाण, माजी आ. डॉ. कृष्णचंद्र भोईटे.श्रीमंत दादाराजे खर्डेकर, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, डॉ. विजयराव बोरावके, नगराध्यक्षा नीता मिलिंद नेवसे, सभापती रेश्माताई भोसले, मिलिंद नेवसे, विलासराव नलावडे, व सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.