Thu, Dec 12, 2019 08:41होमपेज › Satara › राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर नाकारलीः राणे (व्हिडिओ)  

राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर नाकारलीः राणे (व्हिडिओ)  

Published On: Dec 09 2017 10:12PM | Last Updated: Dec 09 2017 10:21PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

मी शिवसेना सोडल्यानंतर कोणत्या पक्षात जायचा याबाबतचा निर्णय घेतला नव्हता. त्यावेळी मला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भेटून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर दिली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांनीही आपली भेट घेतली होती. मात्र, आपण राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास नकार दिला. 

शरद पवार यांच्यासारखा मोठा माणूस आपल्याकडे वारंवार येणे बरोबर वाटत नाही, असे मी त्यावेळी तटकरे यांना सांगितले होते. त्यानंतर मी शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत आपण राष्ट्रवादीत का प्रवेश करू शकत नाही ? याची कारणे दिली होती, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी कराडमध्ये बोलताना केला आहे.