Wed, May 27, 2020 07:07



होमपेज › Satara › अजितदादांच्या मुलाखतीला आ. शिवेंद्रराजे यांची दांडी(video)

अजितदादांच्या मुलाखतीला आ. शिवेंद्रराजे यांची दांडी(video)

Published On: Jul 25 2019 12:05PM | Last Updated: Jul 25 2019 1:12PM

सातारा राष्ट्रवादी भवन



सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील राष्ट्रवादी इच्छुक आमदारांच्या मुलाखतीला दांडी मारली. त्यामुळे आता राष्ट्रवादीत कालवाकालव झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आज गुरूवार मुलाखती होणार आहेत. १७ इच्छुकांचे अर्ज आल्याने सर्वांच्या मुलाखती होणार आहेत. परंतु, आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्ज ही केला नव्हता आणि ते मुलाखतीला पण हजर राहिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

मध्यंतरी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. त्यांच्या मतदारसंघात त्यांना पक्षातूनच अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी तक्रार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे केली होती. आता-शिवेंद्रराजे पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला गैरहजर असल्याने खळबळ उडाली असून राष्ट्रवादीत कालवाकालव सुरू झाली आहे.