Mon, Mar 25, 2019 09:12होमपेज › Satara › कराडातून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास प्रारंभ (व्हिडिओ)

कराडातून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास प्रारंभ (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनास शनिवारी कराडमधून प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ ते कराड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कराड, पाटण तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता. १ डिसेंबरपासून यवतमाळपासून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार असून १२ डिसेंबरला नागपूरमध्ये या आंदोलनाची सांगता होणार आहे. त्याचबरोबर त्यानंतरही सरकारविरोधी संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे.