Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Satara › नालासोपार्‍याचे सातारा कनेक्‍शन, पुण्यातून एक ताब्यात (Video)

नालासोपार्‍याचे सातारा कनेक्‍शन, पुण्यातून एक ताब्यात (Video)

Published On: Aug 11 2018 1:05PM | Last Updated: Aug 11 2018 1:06PMसातारा : प्रतिनिधी

एटीएसच्या पथकाने शुक्रवारी रात्री मुंबईतील नालासोपारा येथे दहशतवाद विरोधी कारवाई केली. यामध्ये मोठा विस्फोटकचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एटीएसने सातारा शहरातील करंजे येथे राहणारा सुन्धवा गोंधळेकर याला पुण्यातून अटक केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. या कारवाईमुळे सातार्‍याचे पुन्हा एकदा भगवा दहशवादाचे हॉट कनेकश्‍न असल्याचे सिद्ध झाले आहे.

वैभव राऊत याला एटीएसने उचलल्यानंतर शरद कळस्कर व सुन्धवा गोंधळेकर ही नावे तपासादरम्यान समोर आलेली आहेत. सुन्धवा गोंधळेकर हा गेल्या अनेक वर्षापासून संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. सुन्धवा गोंधळेकर हा व्यवसायाने ग्राफिक डिझायनर आहे. सातारा उपनगरातील करंजे परिसरातील बाबर कॉलनीत त्याचे घर आहे. सुन्धवा हा सध्या पुण्यात राहतो. मात्र त्याचे कुटूंबिय सातार्‍यात राहतात. सुन्धवा याचा प्रताप समोर आल्यानंतर मात्र त्याच्या कुटूंबियांना मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. सुन्धवा गोंधळेकर बरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक कोण सामील आहेत काय, याचा शोध एटीएस बरोबरच सातारा पोलीसांना घ्यावा लागणार आहे. सातार्‍याचे भगव्या दहशतवादाचे कनेक्शन या शंकेमुळे अनेकांना धक्का बसलेला आहे.