पुणे : हडपसरमध्ये सराईताचा खून

Last Updated: May 24 2020 1:28AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुर्ववैमनस्यातून एकाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. शोएब मस्जीद शेख (वय१९, रा. भेकराईनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निलेश भाऊसाहेब मेमाने (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री १०.३० ते १०.४५ वाजण्याच्या सुमारास सासवड रोड भेकराईनगर येथे घडला.

वाचा :इंदापूर तालुक्यात आणखी २ कोरोना रुग्णांची भर 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खून झालेला तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापुर्वी त्याची व आरोपीची भांडणे झाली होती. त्याच भांडणाचा राग मनात धरून जीवन कांबळे याने त्याच्या इतर साथीदारांसह शेखला एकटे गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेखला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी काही संशयितांना खून प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वाचा : पुण्यात उच्चांकी 358 नवे रुग्ण