Tue, Apr 23, 2019 06:44



होमपेज › Satara › सातारा : बोरगावमध्ये वृद्धाचा खून 

सातारा : बोरगावमध्ये वृद्धाचा खून 

Published On: Aug 13 2018 9:25PM | Last Updated: Aug 13 2018 9:25PM



वेणेगाव : वार्ताहर 

सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्यानजीक पुणे- बेंगलोर  महामार्गाच्या पुलाखाली एकाने चौघांना चाकूने भोकसले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची चर्चा असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

विजय तात्याबा साळुंखे (वय ६४) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेत दीपक नामदेव साळुंखे, उत्तम रंगराव माळवे अनिल शंकर साळुंखे हे तिघेजण जखमी झाले आहेत. 

या घटनेतील संशयिताचे विशाल प्रल्हाद शितोळे (वय २२, रा. आंबेवाडी ता.सातारा)असे  नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी संशयित विशाल शितोळे यास ताब्यात घेतले आहे. त्याने चौघांवर चाकूने वार केले आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य तिघेजण जखमी झाल्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी सांगितले. रात्री उशिरा या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.