Tue, Jun 25, 2019 21:46होमपेज › Satara › झाडे लावण्याच्या वादातून चुलत भावाचा खून

झाडे लावण्याच्या वादातून चुलत भावाचा खून

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:59PMफलटण : प्रतिनिधी

वडले, (ता. फलटण) येथील शेतात झाडे लावण्याच्या कारणावरुन वाद होऊन झालेल्या भांडणात सख्ख्या चुलत भावांनी आपल्याच चुलत भावाचा खून केला असल्याची घटना रविवारी घडली. बाळकृष्ण विठ्ठल सोनवलकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ६ जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कांताबाई बाळकृष्ण सोनवलकर यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार त्यांचे पती बाळकृष्ण विट्ठल सोनवलकर (वय ३५) हे घराशेजारील झाडाखाली रविवारी दि. ३ रोजी सकाळी ९ च्या दरम्यान झाडांसाठी खड्डे घेत असताना खड्डे काढत असताना चुलत भवांच्यात भांडण झाले.  भांडनाचे रूपांतर मारहाणीत झाले यावरून त्यांचे चुलत भाऊ गणेश दशरथ सोनवलकर, दत्तू दशरथ सोनवलकर, शिवाजी दशरथ सोनवलकर, चुलत जाऊ वैशाली दत्तू सोनवलकर, स्वाती शिवाजी सोनवलकर, रेश्मा गणेश सोनवलकर( सर्व रा. वडले ता. फलटण) यांनी मारहाण केली. यामध्ये बाळकृष्ण सोनवलकर यांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अधिक तपास करत आहेत. संशयित लोकांना ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण पोलीस वडले व परिसरात दाखल झाले असून या घटनेनंतर वडले गावात एकच खळबळ उडाली आहे.