Fri, Nov 16, 2018 15:01होमपेज › Satara › सातारा : सोनगाव येथे कुऱ्हाडीने घाव घालून खून

सातारा : सोनगाव येथे कुऱ्हाडीने घाव घालून खून

Published On: Apr 24 2018 11:35PM | Last Updated: Apr 24 2018 11:35PMकुडाळ : प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील सोनगाव येथील राहुल मेंगळे (वय ३५) यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री १० च्या सुमारास घडली. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. डोक्यात कुऱ्हाडीचा घाव खोलवर असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. प्राथमिक उपचारासाठी कुडाळ प्राथमिक केंद्रात त्यांना नेण्यात आले तेथून पुढे पुढील उपचारासाठी साताराला जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी हे वाढपी आहेत. आज एका कार्यक्रमातून आल्यानंतर त्यांच्यात व मृत राहुल यांच्यात वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की त्यामध्ये राहुल मेंगळे यांचा खून झाला. मेढा पोलिस तपास करत आहेत.