Fri, Jul 19, 2019 20:12होमपेज › Satara › उदयनराजेंसह ३३ जणांविरुद्ध चार्जशीट

उदयनराजेंसह ३३ जणांविरुद्ध चार्जशीट

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 10 2018 2:00AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सुरुची राडा प्रकरणातील दुसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) मंगळवारी शाहूपुरी पोलिसांनी सातारा जिल्हा न्यायालयात दाखल केले. या दोषारोपपत्राचे तक्रारदार आमदार गटातील असून, संशयित आरोपींमध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह 33 जणांच्या नावांचा  समावेश असून, सुमारे 100 पानांचे हे दोषारोपपत्र आहे. 

5 ऑक्टोबर रोजी आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन ताब्यात घेण्यावरून खासदार व आमदार गट एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही गटांत झालेल्या राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकूण तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील आमदार गटाच्या वतीने अ‍ॅड. विक्रम पवार यांनी खा. उदयनराजेंसह 200 समर्थकांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील 18 जणांना अटक केलेली आहे. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर त्याचे दोषारोपपत्र मंगळवारी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. यामध्ये खासदार समर्थकांमधील अजिंक्य मोहिते, बाळू ढेकणे, इम्तियाज बागवान, किरण कुर्‍हाडे, केदार राजेशिर्के यांच्यासह 33 नावांचा समावेश आहे. संशयितांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, शस्त्रबंदी, आर्म अ‍ॅक्ट अन्वये तक्रार आहे. दरम्यान, यापूर्वीच पोलिस तक्रारदार असलेले पहिले दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहे. आता या दोन्ही खटल्यांतील सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.