मांढरदेव : वार्ताहर
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून सुरुवात झाली. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. कालपासूनच भाविक जीप, ट्रक, टेम्पो, बस इ. वाहनांतून देव देव्हार्यासह गडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन दिवस अगोदरच मांढरदेवगडाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला सोमवारी जागरादिवशी लाखो भाविकांनी काळूबाईचे दर्शन घेतले.
मंगळवार हा शाकंभरी पौर्णिमेचा (पौष पौर्णिमेचा) मुख्य दिवस असल्याने कडाक्याची थंडी असतानाही भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी सोमवारी रात्रीपासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. शाकंभरी पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी 6 वाजता मुख्य जिल्हा न्यायाधीश आर.एन. लड्डा यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली.
दरम्यान, मांढरदेव यात्रेसाठी चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.