Wed, Apr 24, 2019 19:48होमपेज › Satara › सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 10:52PMफलटण  : प्रतिनिधी

व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही जमीन परत दिली नाही.  ती परत मागायला गेले असता शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, विजय दादासो भोसले ((वय ४५ रा. बिजवडी ता. माण ) सध्या राहणार कोळकी ता. फलटण यांनी हॉटेल व्यवसायासाठी बिजवडी येथील एक एकर जमीन गॅरंटी म्हणून दस्त करून दिली होती. २०१६ साली  दोन लाख रुपये ५ टक्के व्याजाने घेतले होते. ते सर्व पैसे व्याजासह डिसेंबर २०१७ मध्ये दरमहा १० हजार रुपये देऊन व्याज व मुद्दल पूर्ण फेडली. यानंतर विजय भोसले प्रल्हाद इंगळे यांच्याकडे जमीन मागण्यासाठी गेले असता इंगळे याने शिवीगाळ व दमदाटी केली.

याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहा. फौजदार भोईटे करत आहेत.