Fri, Apr 19, 2019 08:17होमपेज › Satara › मोबाईल दुकानदारांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

मोबाईल दुकानदारांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 10:14PMसातारा : प्रतिनिधी

मोबाईल दुकानदारांवर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत सातार्‍यातील मोबाईल असोसिएशनच्या वतीने शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अधिकार्‍यांनी भेटण्यास नकार दिल्याने दुकानदार संतप्त झाले होते.

होलसेल आणि रिटेल दुकानदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मोबाईलचे पार्ट विकण्यावरून एका रिटेल आणि होलसेल दुकानदाराची मारामारी झाली होती. यावरून पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत शनिवारी दुपारी सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर मोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी आणि दुकानदारांनी गर्दी केली होती. 

पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना भेटण्यासाठी सर्वजण पोलीस ठाण्यात आले होते. परंतु सारंगकर तेथे उपस्थित नसल्याने दुकानदार संतप्त झाले होते. सारंगकर यांनी यासंदर्भात दुसर्‍या अधिकार्‍यांना भेटा, असे सांगितले. त्यामुळे आणखीनच दुकानदार संतप्त झाले. काहीजणांनी या प्रकरणाची थेट पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना माहिती दिली.