Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Satara › फलटण : अभियंत्याला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न

फलटण : अभियंत्याला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न

Published On: Jul 11 2018 10:59PM | Last Updated: Jul 11 2018 10:59PMफलटण : प्रतिनिधी 

मुंजवडी, ता.फलटण येथील खराब झालेला डी पी आजच्या आज बदलून द्या नाहीतर पेट्रोल टाकून मारीन. अशी धमकी देत अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सतीश दत्तात्रय राजदीप (वय 53, रा. लक्ष्मी नगर फलटण) हे वीज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता आहेत. बुधवारी दुपारी नानासो पोपट इवरे रा.टाकळवाडा ता. फलटण आणि राहुल देशमुख रा. हनमंतवाडी, ता. फलटण यांच्यासह 6 ते 7 इसम कार्यालयात आले होते.   यामधील नानासो इवरे याने मुंजवडीचा डी पी आजच्या आज बसवून द्या नाहीतर अंगावर पेट्रोल टाकून मारून टाकतो अशी धमकी देऊन बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राजदीप यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.