Wed, May 22, 2019 15:15



होमपेज › Satara › फलटण : पाण्याचं श्रेय लाटायला डोमकावळे टपून : ना.रामराजे

फलटण : पाण्याचं श्रेय लाटायला डोमकावळे टपून : ना.रामराजे

Published On: Feb 10 2018 8:29PM | Last Updated: Feb 10 2018 8:29PM



फलटण : प्रतिनिधी

फलटण तालुक्यात आलेल्या पाण्याचा चांगला उपयोग करून तरुणांनी चांगली व प्रयोगशील शेती करून आपल्या भागाचा विकास करावा, असे आवाहन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. दरम्यान, पाणी आल्यानंतर आता बरेच डोमकावळे येवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील. तथापि, आपण २५ वर्षे पाण्यासाठी खर्ची घालून तालुक्यात पाणी आणले आहे. अन्यथा हे पाणी आंध्र आणि कर्नाटकला गेले असते, असेही ना. रामराजे म्हणाले.

मिरढे, (ता. फलटण) येथील धोम बलकवडीत कृष्णेच्या पाण्याचे पूजन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. जि. प. सदस्य मंगेश धुमाळ,  माणिकराव सोनवलकर, दूध संघाचे चेअरमन धंनजय पवार, विनायक पाटील, मिलिंद नेवसे, पं. स. सदस्य नानासाहेब लंगूटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

ना. रामराजे म्हणाले, १९९९ ते २०१४ मंत्रीपदे खा. शरद पवार यांच्यामुळे मिळाली. १९९५ ते १९९९ काळात अपक्ष आमदार असताना २० ते २२ आमदारांना एकत्र करून कर्जरोखे उभारून कृष्णा खोरे विकास महामंडळांची स्थापना करण्यास भाग पाडले. मी नसतो तर हे पाणी आंध्र व कर्नाटकात गेले असते. ते पाणी अडवले, सर्व परवानग्या आणल्या. आता तालुक्यात पाणी आल्यानंतर बरेच डोमकावळे येतील व म्हणतील आम्ही पाणी आणले, आता पृथ्वीराज चव्हाण यांनाही कोण आणेल. परंतु, पाणी प्रश्न हा राजकारणापलिकडचा आहे. त्यामुळे पाणी कोणी आणले आहे, हे त्रिवार सत्य आहे. केंद्रात पाणी लवाद झाला होता. यावेळी कृष्णा नदीवरील पाण्यावर हक्क सांगितला होता. मात्र ते सर्वांना पटवून देत पाणी कसे सांगितले आणले ते सर्वांना दाखवून दिल्याचे ना. रामराजे म्हणाले.