Fri, Nov 16, 2018 03:00होमपेज › Satara › आम्हाला सोबत घेतले तरच सत्ता : आठवले

आम्हाला सोबत घेतले तरच सत्ता : आठवले

Published On: Mar 10 2018 3:12PM | Last Updated: Mar 10 2018 3:12PMसातारा : प्रतिनिधी

बहुजन समाजासह इतर सर्व जाती-धर्मातील लोकांमुळे मोदी सरकारला केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्त झाली आहे. त्याकाळात मोदी सरकारबरोबर माझीही हवा होती. येथून पुढे सरकारला सत्ता प्राप्त करावयाची असेल तर आम्हाला सोबत घेऊनच जावे लागेल. सन २०१९ लोकसभा निवडणूका पंतप्रधान नरेंद्र मोदीच जिंकणार असल्याचा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

माजीमंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी सांगलीकडे निघाले होते. त्यावेळी सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, राज्यासह देशात अनेक ठिकाणी पुतळे पाडण्याचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व निंदनीय आहे. पुतळे पाडून काही विचार संपणार नाहीत याबाबत आम्ही शासनाकडे थोर पुरूषांच्या पुतळ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्यांनी कोणी पुतळे पाडले आहेत अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.

राज्याच्या राजकारणावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, केंद्रासारखी राज्यात परिस्थिती नाही. शिवसेना पक्ष सत्तेत असला तरी सातत्याने विरोधाची भूमिका घेत आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टीकेचा सूर बदलायला हवा. आगामी काळात होणार्‍या निवडणुकांमध्ये शिवसेना वेगळी लढली तर त्यांचे नुकसान होणार आहे. शिवसेनेने काहीही भूमिका घेतली तरी भाजपाबरोबर रिपाई राहणार आहे.