Fri, Jan 18, 2019 23:24होमपेज › Satara › कराडः 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे पोलिसांच्या ताब्यात

कराडः 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे पोलिसांच्या ताब्यात

Published On: Jul 17 2018 1:43PM | Last Updated: Jul 17 2018 1:56PMकराडः प्रतिनिधी

दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दूध संकलनासाठी निघालेला कोयना दूध संघाचा टेम्पो कराड-कृष्णा कॅनॉल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे व कार्यकर्त्यांनी अडवला. पोलिसांनी त्वरित सचिन नलवडेसह तिघांना ताब्यात घेतले. 

सर्वांना पोलिस जीपमधून पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील कारवाई करणार असल्याचे कराडचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले.