Thu, Jul 18, 2019 10:56होमपेज › Satara › मेढा येथे सद्भावना रॅली

मेढा येथे सद्भावना रॅली

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:29PM

बुकमार्क करा
मेढा : वार्ताहर

जावली तालुक्यातील सर्वधर्मीय व सर्वपक्षीयांच्यावतीने मेढा येथे सदभावना रॅली काढण्यात आली. त्यामध्ये हिंदू, मुस्लीम, बौध्द समाजातील सह सर्व जातीचे लोक सामील झाले होते.सद्यस्थितीत सुरु असलेल्या समाज विघातक घटना व देशासाठी प्रतिकुल परिस्थितीत जातीभेद विसरून आपण सर्व भारतीय एक आहोत हा संदेश प्रत्येकाच्या मनात रूजायला हवा, यासाठीच या सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जातीयवादाला थारा न देता जावली तालुक्यासह महाराष्ट्रात आणि देशामध्ये सामाजिक बांधिलकी व एकोपा टिकवून जातीवादाची मुळे उखडून राष्ट्रप्रेम ही सदभावना विचारात घेवून एक नवीन आदर्श जगापुढे निर्माण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या रॅलीमध्येे तहसिलदार रोहिणी आखाडे, स.पो.नि. जीवन माने, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,  विलासबाबा जवळ, संपत कांबळे, फारूख शेख, एकनाथ रोकडे, संतोष वारागडे, सुनिल मोरे, योगेश कांबळे, विजय पंडित, दत्तात्रय करंजेकर, प्रविण पवार तसेच सर्व शाळा महाविद्यालयांचे व आय.टी.आयचे विद्यार्थी व आद्यापक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.