Sat, Feb 16, 2019 07:27होमपेज › Satara › समाजासाठी योगदान द्या आ. शिवेंद्रराजे भोसले

समाजासाठी योगदान द्या आ. शिवेंद्रराजे भोसले

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:26PMमेढा : वार्ताहर

ओझरे येथील वेण्णा फौंडेशनचे कार्य स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सर्वच संस्थांनी समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.   ओझरे येथे वेण्णा फौंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते माजी सभापती मानसिंगराव मर्ढेकर, आनंदराव लकडे, जि.प.सदस्या अर्चना रांजणे, पंचायत समिती सदस्या कांताबाई सुतार, ज्ञानदेव रांजणे, शिवाजीराव घोरपडे, संतोष मर्ढेकर, सुनील मर्ढेकर, सरपंच सौ रुपाली जंगम, उपसरपंच अजित मर्ढेकर, फौंडेशनचे अध्यक्ष शरद मर्ढेकर  उपास्थित होते.
रक्तदान शिबिरामध्ये 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  सूत्रसंचालन व प्रास्ताविक अशोक लकडे यांनी केले तर आभार इंगुळकर गुरूजी यांनी मानले.